Wednesday, 14 October 2026

मंडळे, मंदिरे आणि जगभरातील महाराष्ट्र मंडळांना सहभागी होण्याचे आवाहनBappa.org’वर नोंदणी

 मंडळे, मंदिरे आणि जगभरातील महाराष्ट्र मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन

राज्यातील प्रत्येक गणेश मंडळ आणि मंदिराने ‘Bappa.org’वर नोंदणी करून आपल्या इतिहासाची, जुन्या छायाचित्रांची आणि परंपरांची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. परदेशात कार्यरत महाराष्ट्र मंडळांनीही या उपक्रमात सहभागी होऊन आपापल्या भागातील गणेशोत्सवाच्या परंपरा आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती नोंदवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी १४ ते २० ऑक्टोबरदरम्यान विषयानुसार संदेश, प्रसिद्धिपत्रके, विशेष लेख आणि समाजमाध्यमांवरील माहितीपत्रके प्रसारित करण्याचे नियोजन आहे. जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातूनही या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.

 

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील गणेश परंपरा, प्रत्येक मंडळाचा इतिहास आणि प्रत्येक कलाकाराची कला यांची नोंद करून हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशाने नागरिकांनी ‘Bappa.org’ या व्यासपीठाचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi