Wednesday, 14 October 2026

नांदेड जिल्ह्यातील १०४ प्रकल्पात सध्या ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मंजूर पाणीसाठ्याव्यतिरिक्त प्रत्येक

 नांदेड जिल्ह्यातील १०४ प्रकल्पात सध्या ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मंजूर पाणीसाठ्याव्यतिरिक्त प्रत्येक प्रमुख जलाशयाच्या उपलब्ध जिवंत पाणीसाठ्यापैकी किमान १० टक्के साठा आपत्कालीन साठा म्हणून राखून ठेवण्यात यावा. बफर साठा हा अनपेक्षित पर्जन्यमानातील घट, दीर्घ कोरडा कालावधी वाढणे किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी राखीव राहील. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. शहरातील उद्याने, स्टेडियम यांच्यासाठी पाण्याचा वापर टाळावा, औद्योगिक वसाहतींनी ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करावा, असे निर्देश मंत्री सावे यांनी यावेळी दिले.

 

जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी जोडणीवर तत्काळ कारवाई करावी, महापालिका क्षेत्रात पाणी गळतीवर नियंत्रण आणावे, मार्च-एप्रिल महिन्यात ज्या ठिकाणी अधिक पाणी टंचाई निर्माण होईल, अशा गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, असे निर्देश मंत्री सावे यांनी दिले.

 

जिल्हा प्रशासनाने प्रत्येक महिन्याला टंचाईचा आढावा घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

 

बैठकीत जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमधील सद्यस्थितीतील उपलब्ध उपयुक्त जलसाठा व मृत साठ्याचा आढावा घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi