Friday, 9 October 2026

महाराष्ट्र देशाचे अग्रगण्य आर्थिक आणि औद्योगिक केंद्र आहे. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक मोबिलिटी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रगत अभियांत्रिकी, रसायने, जीवन

 वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, भारत आणि जपानमधील संबंध हे परस्पर विश्वास, एकमेकांचा आदर आणि समान मूल्यांवर आधारलेले आहेत. उत्पादन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, पुरवठा साखळी आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांना एकत्र काम करण्याची मोठी संधी आहे. जपानकडे प्रगत तंत्रज्ञान, अचूकता, गुणवत्ता आणि उत्पादन क्षेत्रातील जागतिक उत्कृष्टता आहे, तर भारताकडे मोठी बाजारपेठ, कुशल तरुण मनुष्यबळ आणि प्रचंड आर्थिक क्षमता आहे. ही सांगड अत्यंत सामर्थ्यशाली असून, भारत-जपान भागीदारी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महाराष्ट्र देशात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

 

महाराष्ट्र देशाचे अग्रगण्य आर्थिक आणि औद्योगिक केंद्र आहे. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक मोबिलिटी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रगत अभियांत्रिकी, रसायने, जीवन विज्ञान, स्वच्छ ऊर्जा, लॉजिस्टिक्स, कृषी आणि वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड क्षमता आहे.

 

वस्त्रोद्योग हे रोजगारक्षम क्षेत्र आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, कौशल्य, पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ यांचा समन्वय साधत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक परिसंस्था निर्माण करणे हे राज्य शासनाचे मुख्य ध्येय आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi