Friday, 9 October 2026

जपानी उद्योगांच्या विस्तारासाठी सहकार्य

 जपानी उद्योगांच्या विस्तारासाठी सहकार्य

– वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार भागीदार म्हणून महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचे आवाहन

मुंबई,धोरणात्मक दि. ८ : भारत-जपान संबंधांना आर्थिक सहकार्याची नवी व्यापक दिशा देण्याची ही योग्य वेळ असून, जपानी उद्योगांच्या विस्तारासाठी महाराष्ट्र सर्वतोपरी सहकार्य करेल. जपानी कंपन्यांनी महाराष्ट्राकडे केवळ गुंतवणुकीचे केंद्र म्हणून न पाहता, भारतासह जागतिक बाजारपेठेतील विस्तारासाठी धोरणात्मक भागीदार आणि सक्षम लॉजिस्टिक्स हब म्हणून पाहावे, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले

हॉटेल ताज लँड्स एन्ड, वांद्रे येथे निक्केई एशिया आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘निक्केई इंडिया-जपान इकॉनॉमी अँड इन्व्हेस्टमेंट फोरम’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी भारतातील जपानचे राजदूत केइची ओनो, निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिक्का, जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशनच्या इक्विटी फायनान्स समूहाच्या जागतिक प्रमुख व वरिष्ठ कार्यकारी व्यवस्थापकीय अधिकारी काझुको साकुमा, टोयो इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक ताकाशी कावाहारा यांच्यासह जपान व भारतातील उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi