प्रत्यक्ष पाहणीसाठी जिल्हे आणि ठिकाणे निश्चित
राज्य शासनाने सादर केलेली आकडेवारी, उपलब्ध पुरावे आणि विविध विभागांकडून मिळालेल्या माहितीची केंद्रीय पथकाने दखल घेतली. या माहितीच्या आधारे दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोणत्या जिल्ह्यांना आणि ठिकाणांना भेटी द्यायच्या, याबाबत नियोजन करण्यात आले.
केंद्रीय पथकातील अधिकारी राज्यातील विविध भागांत जाऊन दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यासाठी विविध पथके तयार करुन जास्तीत जास्त क्षेत्राचा आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाहणीदरम्यान स्थानिक अधिकारी, तज्ज्ञ आणि राज्य शासनाचे संबंधित अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
प्रत्यक्ष पाहणी पूर्ण केल्यानंतर केंद्रीय पथक मुंबईत परतणार असून 11 ऑक्टोबर रोजी दुष्काळी परिस्थितीबाबत पुढील सविस्तर चर्चा करणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळाची वस्तुस्थिती, शेतीपिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती केंद्र सरकारसमोर मांडली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment