Thursday, 18 September 2025

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम राबवणार

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त

राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम राबवणार

- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

·         नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र उभारणार

मुंबई, दि. १७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यटन विभागामार्फत राज्यातील ७५०० युवांना प्रशिक्षण देण्याचा ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’  व  पर्यटकांना सुविधा देणारे ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ पाच ठिकाणी उभारण्यात येणार आहे. 'नमो पर्यटनउपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देतजागतिक पर्यटकांना आकर्षित करेल. हा उपक्रम महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रातील नवा मैलाचा दगड ठरेल. हा उपक्रम प्रधानमंत्री यांच्या सर्वसमावेशक आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचे मूर्त स्वरूप आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

            मेघदूत बंगला येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.

'नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम': स्थानिकांना सक्षम बनवणे या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत ७ हजार ५०० स्थानिक युवक-युवतींना आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) आणि मार्गदर्शक (टूर गाईड) म्हणून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi