Thursday, 18 September 2025

सुप्त शक्तीची आठवण करुन देण्यासाठी अभियान

 सुप्त शक्तीची आठवण करुन देण्यासाठी अभियान

या अभियानामुळे वंचित घटकांच्या जीवनात बदल घडवू. त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. गावात एकजूटीने राहून आपण समृद्धी आणू. राज्यातील अनेक गावांत लोक वेगवेगळे प्रयत्न करुन परिवर्तन घडवित आहेत. एआयचा कृषीत वापर केला जात आहे. आपल्या प्रत्येकामध्ये हे परिवर्तन घडविण्याची सुप्त शक्ती आहे. त्या सुप्त शक्तीची आठवण करुन देण्यासाठीच हे अभियान आहे. प्रत्येक ग्रामस्थाने हे अभियान आपले आहे असे समजून सहभाग द्यावा आणि सक्षम महाराष्ट्र घडवावाआजपासून ही स्पर्धा सुरु झाली अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. त्यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली. या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुकास्तरावर प्रथम १५ लाख,द्वितीय १२ लाख आणि तृतीय ८ लाखजिल्हास्तरावर प्रथम ५० लाख,द्वितीय ३० लाख आणि तृतीय २० लाख तर राज्यस्तरावर प्रथम ५ कोटी,द्वितीय ३ कोटी आणि तृतीय २ कोटी रुपयांची बक्षिसे मिळणार आहेतअसे त्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi