आदरातिथ्य प्रशिक्षण: 'स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी' यांच्या सहकार्याने तर मार्गदर्शक प्रशिक्षण : 'भारतीय पर्यटन आणि यात्रा प्रबंध संस्थान, ग्वाल्हेर' यांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना पर्यटन संचालनालयाकडून प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि अधिकृत परवाना प्रदान केला जाईल, ज्यामुळे त्यांना पर्यटन क्षेत्रात व्यावसायिक संधी मिळतील.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पहिल्या टप्प्यात जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झालेले रायगड, प्रतापगड, शिवनेरी व साल्हेर या किल्ल्यांच्या ठिकाणी नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे तसेच आगामी काळात राज्यातील ७५ पर्यटन स्थळी नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. या पर्यटन सुविधा केंद्रामध्ये शिशु कक्ष, दिव्यांगांकरीता विशेष सुविधा, वृद्धाकरिता सुविधा केंद्र, डिजिटल प्लॅटफॉर्म त्यामध्ये अनुभव कक्ष, बहुभाषिक सहाय्य व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जपलेल्या तत्वाप्रमाणे सर्व नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र दिव्यांग सुलभ व सर्व समावेशक तसेच महिला, मुले व जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सोयी उपलब्ध करुन देणारे असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment