Tuesday, 3 August 2021

 [03/08, 08:56] Baby: *नागपूर हिवाळी अधिवेशनातील दुपारच्या सत्रात प्रचंड गोंधळ झाला....*


*२८८ आमदारांपैकी २८७ आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली.फाईल्स फेकून दिल्या सभागृहाचे कामकाज चालूच दिलं नाही.गोंधळ घालणारया आमदारांनी सभागृहाची दयनीय अवस्था करून टाकली...*


*२८७ आमदार सभागृहाच्या बाहेर निघून गेले.त्या सभागृहात फक्त एकच आमदार होते ते म्हणजे आदरणीय #गणपतराव_देशमुख....*


*गणपतराव देशमुख सभागृहात मान खाली घालून दोन्ही हात डोक्याला लावून चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले....*


*दुसऱ्या दिवशी #इंडियन_एक्सप्रेस या वर्तमानपत्रा मध्ये डोक्याला दोन्ही हात लावून बसलेल्या गणपतराव(आबा) देशमुखांचा फोटो छापून आला ती बातमी व फोटो पाहून लोकांना एक विलक्षण धक्का बसला....*


*२८७आमदारांनी अधिवेशनात गोंधळ का घातला असेल...?*


*महाराष्ट्रातील जनतेला वाटलं गरीबाच्या पुनर्वसनाचा अथवा या पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेच्या लोकहितासाठी गोंधळ घातला गेला असेल ?*


*पण जेव्हा लोकांना कळलं की फायली भिरकावत कालचा गोंधळ हा #आमदारांची_पेन्शन_वाढ_करावी म्हणून घातला गेला होता....*


*त्या सभागृहात डोक्याला हात लावून बसलेले एकमेव आमदार गणपतराव देशमुख (आबा ) यांना पेन्शन वाढ नको होती....*


*नंतर पत्रकारांनी गणपतराव ( आबा ) देशमुख यांना विचारले तुम्हाला पेन्शन वाढ का नको आहे....?*


*पत्रकारांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देतेवेळी गणपतराव देशमुख यांनी सांगितले की....*


*महाराष्ट्रातील बहुतांश जनता ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही गरीब  हे आणखीनच गरीबच होत चाललेत.त्यांना रहायला घरे नाहीत.महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत....*


*आपल्याला लोकांनी विकासकामं करण्यासाठी निवडून दिले आहे स्वतःची पेंन्शन वाढ करून घेण्यासाठी नव्हे....!*


*इतका गोंधळ होऊन देखील तिसऱ्या दिवशी पेन्शनवाढ मंजूर झाली........*😢


*कारण सभागृहात सर्वच नेते गणपतराव ( आबा ) देशमुख नव्हते....!*


*घरातून बाहेर पडल्यानंतर घरासमोर उभारून मिळेल त्या एस.टी.बसने प्रवास सुरू करून मतदारसंघ पिंजून काढणारे व मंत्रीपद जाताच क्षणी सरकारी गाडीचा त्याग करणारे तसेच जमिनीशी जोडली गेलेली नाळ तुटू न देणारे आदरणीय गणपतराव ( आबा ) देशमुख यांना....*


*_भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन !_*

     🌹🙏🌹

[03/08, 10:01] Baby: *आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात  वेळ दड़वु नका,* *जो क्षण आयुष्यात  येईल त्याला  सुंदर करण्याचा प्रयत्न करा..*  *जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,,,*

*कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते,,,* *आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान असतो.....*

 🙏🌹* *शुभ दिन **🌹🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi