*साथरोग नियंत्रणासाठी चिपळूण मध्ये पाच फिरते दवाखाने*
जगद्गुरु नरेंद्र चार्य महाराज संस्थानाचा लोकोपयोगी उपक्रम,शहरात साफसफाई देखील सुरूच.
क्षेत्र नाणीज धाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानातर्फे शनिवारपासून पाच फिरते दवाखाने सुरु करण्यात आले. संस्थानाच्या रुग्णवाहिका रूपांतरण दवाखान्यात करण्यात आले आहे. ते वेगवेगळ्या या ठिकाणी जाऊन उपचार करतील तसेच चिपळूण व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर सुद्धा त्यांचा उपयोग होणार आहे.
महापुरानंतर चिपळूणची परिस्थिती अद्याप गंभीर आहे .गाळ, साचलेले पाणी, डास आदींमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. संस्थानाच्या फिरत्या दवाखान्याची सोय केली आहे त्यामध्ये डॉक्टर्स , नर्स,पुरेसा औषध साठा आहे वाड्या वस्त्यांवर जाऊन गरिबांवर मोफत उपचार होणार आहेत.
No comments:
Post a Comment