Tuesday, 3 August 2021

 टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या उंच उडीचा हा अंतिम सामना होता.  अंतिम फेरीत इटलीच्या *जियानमार्को टँपबेरी* चा सामना कतारच्या *मुताजएस्सा बार्शीम* शी होता.  दोघांनी 2.37 मीटर उडी मारली आणि बरोबरीवर होते!  त्यामुळे ऑलिम्पिक अधिकार्‍यांनी नियमानुसार प्रत्येकाला आणखी तीन प्रयत्न करायला सांगितले, परंतु त्यात ते दोघेही 2.37 मीटरपेक्षा जास्त गाठू शकले नाहीत.


 त्या दोघांना आणखी एक अतिरिक्त संधी देण्यात आली, पण पायाच्या गंभीर दुखापतीमुळे *टँपबेरी* ने शेवटच्या प्रयत्नातून माघार घेतली.  आता खरं तर *बार्शीम* समोर दुसरा विरोधक नव्हता, तो क्षण जेव्हा तो एकटा सुवर्ण पदकाचा मानकरी उरला होता!


 पण *बार्शीम* ने अधिकाऱ्याला विचारले "जर मी सुद्धा शेवटच्या प्रयत्नातून माघार घेतली तर काय होऊ शकते का?"  अधिकारी सर्व नियम  तपासतो आणि म्हणतो "मग अश्यावेळी सुवर्णपदक तुमच्या दोघांमध्ये वाटले जाईल".  त्यानंतर *बार्शीम* ने क्षणाचाही विलंब न करता शेवटच्या प्रयत्नातून माघार घेण्याची घोषणा केली.


 हे पाहून इटालियन प्रतिस्पर्धी *टँपबेरी* धावला आणि *बार्शीम* ला मिठी मारली आणि त्याला अतीहर्षामुळे रडू कोसळले!  

.... खेळाच्या अत्युच्च प्रकारात एका माणुसकीची, विश्वबंधुत्वाची ही झलक हृदयस्पर्शी आहे. खेळभावना आणि प्रेम याचा हा अद्भुत संगम हेच ऑलिम्पिक च्या जागतिक आयोजनाचे उद्दिष्ट परिपूर्ण साध्य झाले असे म्हणता येईल.

*तुला मनापासून सलाम बार्शीम.  तू मनं जिंकलीस लेका! ... म्हणजेच जग जिंकलास.*

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi