Friday, 16 October 2026

बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत, तर राष्ट्रनिर्माणातील भागीदारजनधन, आधार, यूपीआयमुळे बदल

 बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत, तर राष्ट्रनिर्माणातील भागीदार 

-राज्यपाल जिष्णु देव वर्मा

  • ‘असोचॅम’चा २१ व्या वार्षिक बँकिंग व वित्तीय क्षेत्र परिषद आणि पुरस्कार सोहळा
  • महिलांच्या क्षमतेवर वित्तीय संस्थांनी विश्वास ठेवण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. १६ : बँका आणि वित्तीय संस्था फक्त कर्ज आणि वित्तीय सेवा देत नाहीत, तर त्या राष्ट्रनिर्माणात भागीदार आहेत. बचत जमा करून, उद्योगांना पाठबळ देऊन आणि पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करून त्या रोजगारनिर्मिती, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक विकासाला थेट हातभार लावतात. विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट गाठण्यात वित्तीय क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचॅम) तर्फे ‘बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील कर्ज देणाऱ्या कंपन्यां’साठी २१ वी वार्षिक परिषद आणि पुरस्कार सोहळा वरळी येथील हॉटेल फोर सीझन्स येथे झाला. ‘रेझिलियन्स, रिइन्व्हेन्शन अँड इंडियाज राईज’ (लवचिकता, नवनिर्मिती आणि भारताचा उदय) ही परिषदेची संकल्पना होती. ‘असोचॅम’चे अध्यक्ष निर्मल के. मिंडा, सरचिटणीस सौरभ सन्याल, ‘असोचॅम’च्या बँकिंगविषयक राष्ट्रीय परिषदेचे सहअध्यक्ष आणि बँक ऑफ बहरीन अँड कुवेतचे भारतातील कंट्री हेड व मुख्य कार्यकारी अधिकारी माधव नायर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ‘असोचॅम’च्या राष्ट्रीय बँकिंग परिषदेचे सह-अध्यक्ष तथा येस बँकेचे कार्यकारी संचालक मनीष जैन यांच्यासह धोरणकर्ते, नियामक संस्थांचे प्रतिनिधी आणि बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

जनधन, आधार, यूपीआयमुळे बदल

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, २०१४ पासून देशात वित्तीय समावेशनात मोठी प्रगती झाली आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे कोट्यवधी नागरिक औपचारिक बँकिंग व्यवस्थेत आले. ‘आधार’वर आधारित सेवा, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) आणि यूपीआयमुळे वित्तीय सेवा देण्याची पद्धत बदलली. व्यवहार अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम झाले. मात्र, वित्तीय समावेशन फक्त बँक खाती उघडणे आणि डिजिटल पेमेंटपुरते मर्यादित राहू नये, तर गरीब समाजघटक, ग्रामीण कुटुंबे आणि लहान उद्योजकांना परवडणारे कर्ज, विमा, निवृत्तिवेतन आणि इतर वित्तीय सेवाही मिळायला हव्यात, असे राज्यपालांनी यावेळी नमूद केले.

समान नागरी संहितेबाबत सूचना व अभिप्राय १५ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे नागरिकांना आवाहन

 समान नागरी संहितेबाबत सूचना व अभिप्राय १५ नोव्हेंबर पर्यंत

सादर करण्याचे नागरिकांना आवाहन


नागरिकांच्या सहभागासाठी विशेष वेब पोर्टलचा शुभारंभ


मुंबई, दि. १५ : राज्यातील नागरिकांनी समान नागरी संहितेबाबत आपल्या सूचना व अभिप्राय १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वेब पोर्टल, ई-मेल किंवा टपालाद्वारे सादर करावेत, असे आवाहन समान नागरी संहिता समितीने केले आहे.

नागरिकांना सूचना व अभिप्राय सादर करता यावेत, यासाठी विशेष वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. समितीच्या अध्यक्षा तथा सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्याहस्ते या पोर्टलचा दूरदृष्य संवाद प्रणाली द्वारे शुभारंभ करण्यात आला

समान नागरी संहितेच्या घटनात्मक, कायदेशीर, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय पैलूंचा समिती सखोल अभ्यास करणार आहे. राज्यातील विविध धर्म, परंपरा, सामाजिक संरचना, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, महिलांचे अधिकार, लैंगिक समानता आणि सर्व नागरिकांना समान न्याय या बाबींचा वस्तुनिष्ठपणे विचार केला जाणार आहे

नागरिकांनी सूचना व अभिप्राय https://ucc.maharashtra.gov.in/ या वेब पोर्टलवर किंवा ucc@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवावेत. टपालाद्वारे समान नागरी संहिता समिती महाराष्ट्र कार्यालय, दुसरा मजला, जुने कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र–४००००१ या पत्त्यावर पाठविण्यात याव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

समिती इतर राज्यांतील समान नागरी संहितेशी संबंधित कायदे, नियम, अंमलबजावणीची प्रक्रिया, अनुभव आणि अडचणींचाही अभ्यास करणार आहे. विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, उत्तराधिकार आणि अन्य वैयक्तिक कायद्यांचे परीक्षण करून आवश्यक शिफारशी शासनाला सादर करणार आहे. समितीकडून संभाव्य अंमलबजावणीमुळे उद्भवणाऱ्या सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय आणि कायदेशीर परिणामांचे मूल्यमापन करून आवश्यक कायदेशीर, प्रशासकीय व संस्थात्मक उपाययोजनाही सुचविण्यात येणार आहेत.

विविध धार्मिक प्रतिनिधी, कायदेतज्ज्ञ, राजकीय, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, शैक्षणिक संस्था, तज्ज्ञ आणि सर्वसामान्य नागरिकांचे विचार समिती जाणून घेणार आहे. विविध पैलूंवर सार्वजनिक सल्लामसलत आणि जनसुनावणीही आयोजित करण्यात येणार आहे, असे समितीच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावे -सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांना आवाहन mahanatyaspardha.com

 राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेmahanatyaspardha.com

-सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांना आवाहन

 

            मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या परीक्षणासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून, इच्छुकांनी २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे. यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धांना १६ नोव्हेंबर २०२६ पासून प्रारंभ होणार आहे.

 

            सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी हौशी मराठी, हौशी हिंदी, संस्कृत, संगीत नाट्य, मराठी बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य, मराठी एकांकिका तसेच मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धांसह विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

 

            या स्पर्धांमधील नाटकांच्या परीक्षण प्रक्रियेत नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांचा अधिकाधिक सहभाग वाढविणे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ स्पर्धक कलाकार व नाट्यसंस्थांना मिळवून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यानुसार यंदा परीक्षणासाठी इच्छुक कलाकारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

            सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

अर्ज कुठे करावा?

 

            परीक्षणासाठी इच्छुक व पात्र कलाकारांनी २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक माहितीसाठी याच संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

            नाट्य क्षेत्रातील पात्र व अनुभवी कलाकारांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी’ उत्तर विभाग कार्यालयात महाराजस्व शिबिर ‘सेवा संकल्प अभियाना’चा नागरिकांना लाभ

 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी’ उत्तर विभाग कार्यालयात महाराजस्व शिबिर

  • ‘सेवा संकल्प अभियाना’चा नागरिकांना लाभ

 

मुंबई, दि. १५ :- नागरिकांना शासकीय सेवा सहज मिळाव्यात यासाठी ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत दादर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी’ उत्तर विभाग कार्यालयात महाराजस्व शिबिर घेण्यात आले. शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विविध सेवांचा लाभ घेतला.

 

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका प्रशासनाने हे शिबिर संयुक्तपणे आयोजित केले होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते २६ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे देण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, महानगरपालिकेच्या ‘जी’ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई, तहसीलदार डॉ. मानसी मार्लेवार, नायब तहसीलदार प्रभाकर नाईक, ‘बेस्ट’चे उप मुख्य अभियंता शरद पवार, उत्तर विभागाचे विभागीय अभियंता जयवंत पवार, प्रभाग समिती अध्यक्ष यशवंत किल्लेदार, नगरसेवक भास्कर शेट्टी, नगरसेवक जोसेफ कोळी, नगरसेवक मिलिंद वैद्य, नगरसेविका हर्षला मोरे, नगरसेविका आशा काळे, नगरसेविका शीतल गंभीर-देसाई, नगरसेविका अर्चना शिंदे आणि इतर कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. उदघाटन कार्यक्रमाचे संचलन सहायक उद्यान अधीक्षक रणजित नलगे यांनी केले.

 

दाखले, प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांशी संबंधित रखडलेली कामे लवकर मार्गी लागावीत आणि नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांत जावे लागू नयेत, यासाठी शिबिरात खास व्यवस्था करण्यात आली होती. शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.

 

शिबिरात नोंदणी व मुद्रांक, नळ जोडणी, वीज जोडणी, आधार सेवा केंद्र, कर निर्धारण व संकलन, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, शिधापत्रिका वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र या सेवांसाठी स्वतंत्र व्यवस्था होती. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत नागरिकांच्या मदतीसाठी ‘१९५०’ हेल्पलाइन सुरूhttps://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx

 मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीमhttps://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx

  • १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे
  • दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत
  • नागरिकांच्या मदतीसाठी ‘१९५०’ हेल्पलाइन सुरू

 

मुंबई, दि. १५ : राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यकतेनुसार नाव नोंदणी किंवा दुरुस्तीच्या अनुषंगाने दि २६ ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. विशेष शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि इतर आवश्यक प्रक्रियांबाबत मार्गदर्शन व मदत करतील . मतदार यादीत नाव समावेशन करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ भरता येतो. मतदार यादीतील नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ७ वापरावा. तसेच निवासस्थानातील बदल, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती, नवीन मतदार ओळखपत्र मिळविणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ८ भरता येतो.

 

मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती ही वर्षभर सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पात्र नवीन मतदार किंवा प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांना नमुना अर्ज क्रमांक ६ द्वारे नोंदणी करता येईल. नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि तपशील तपासून आवश्यक अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

मतदार यादी तपासणे, नमुना अर्ज क्रमांक ६ भरणे किंवा नोंदणी प्रक्रियेसंदर्भात काही अडचण अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी ‘१९५०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कार्यालयीन वेळेत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय मदत केंद्र किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या मदत केंद्राशी संपर्क साधता येईल.

 

जिल्हानिहाय मतदार हेल्पलाइन आणि मदत केंद्रांचा सविस्तर तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा आणि २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

0000


 


मनोरा आमदार निवास प्रकल्पाचे काम एल अँड टी कंपनी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने काम

 मनोरा आमदार निवास प्रकल्पाचे काम एल अँड टी कंपनी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने काम करीत आहे. आराखड्यापासून प्रकल्प हस्तांतरणापर्यंतची कामे तसेच हस्तांतरणानंतर सहा महिन्यांचे संक्रमणकालीन संचालन व देखभाल यांचा कंत्राटात समावेश आहे. प्रकल्पात एक तळघर, पार्किंगचे सहा स्तर आणि सातव्या स्तरावर पोडियम असेल. दोन्ही मनोरे १५, २२ आणि २९ व्या मजल्यांवर जोडपुलांनी जोडले जातील. अग्निसुरक्षा निकषांनुसार खालचे दोन जोडपूल बाजूंनी खुले राहतील, तर सर्वोच्च जोडपुलाच्या स्तरावर सुविधा क्षेत्राचे नियोजन केले आहे. सर्व कामे मंजूर आराखडा आणि लागू नियमांनुसारच करण्यावर भर देण्यात आला आहे, असे सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले.

 

            मंत्रालय शेजारी बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या कामाच्या प्रगतीचाही यावेळी भोसले यांनी आढावा घेतला. या इमारतीचे बांधकाम धीम्या गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे कडक सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच हे काम करताना दर्जा राखण्याचेही निर्देशही दिले.

 

            यावेळी मंत्री भोसले यांनी एअर इंडिया इमारतीमधील कामाचाही तसेच इमारतीवर उभारण्यात येणाऱ्या लोगोच्या संदर्भातही माहिती घेतली.

चेक टेक्निकल युनिव्हर्सिटी, चार्ल्स युनिव्हर्सिटी आणि ब्रनो युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी यांसारख्या अग्रगण्य विद्यापीठांनी

 अचूक अभियांत्रिकी, हवाई क्षेत्र, संरक्षण, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकी आणि प्रगत तंत्रज्ञानातील चेक प्रजासत्ताकच्या क्षमतांना पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूरमधील औद्योगिक समूहांसह राज्यातील वैज्ञानिक संस्थांची जोड देता येईल. चेक प्रजासत्ताक आणि महाराष्ट्रातील कंपन्या व संस्थांनी केवळ खरेदी-विक्रीपुरते मर्यादित न राहता संयुक्त उपक्रम, तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त संशोधन व विकास तसेच सहउत्पादनावर भर द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

 

चेक टेक्निकल युनिव्हर्सिटी, चार्ल्स युनिव्हर्सिटी आणि ब्रनो युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी यांसारख्या अग्रगण्य विद्यापीठांनी महाराष्ट्रात शैक्षणिक संधी  निर्माण करण्याच्या शक्यता तपासाव्यात. संयुक्त पदवी अभ्यासक्रम, संशोधन कार्यक्रम, पीएच.डी. आणि विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रम राबविण्यासाठीही सहकार्य करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

 

महाराष्ट्राकडे अभियंते, तंत्रज्ञ, माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिक आणि कुशल युवकांचे मोठे मनुष्यबळ उपलब्ध आहे. चेक उद्योगांच्या गरजांनुसार उत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञ, अभियंते, माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिक, परिचारिका आणि अन्य कुशल मनुष्यबळासाठी संरचित महाराष्ट्र-चेक प्रजासत्ताक कौशल्य गतिशीलता भागीदारीच्या शक्यता तपासाव्यात, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

Featured post

Lakshvedhi