Friday, 16 October 2026

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी’ उत्तर विभाग कार्यालयात महाराजस्व शिबिर ‘सेवा संकल्प अभियाना’चा नागरिकांना लाभ

 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी’ उत्तर विभाग कार्यालयात महाराजस्व शिबिर

  • ‘सेवा संकल्प अभियाना’चा नागरिकांना लाभ

 

मुंबई, दि. १५ :- नागरिकांना शासकीय सेवा सहज मिळाव्यात यासाठी ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत दादर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी’ उत्तर विभाग कार्यालयात महाराजस्व शिबिर घेण्यात आले. शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विविध सेवांचा लाभ घेतला.

 

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका प्रशासनाने हे शिबिर संयुक्तपणे आयोजित केले होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते २६ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे देण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, महानगरपालिकेच्या ‘जी’ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई, तहसीलदार डॉ. मानसी मार्लेवार, नायब तहसीलदार प्रभाकर नाईक, ‘बेस्ट’चे उप मुख्य अभियंता शरद पवार, उत्तर विभागाचे विभागीय अभियंता जयवंत पवार, प्रभाग समिती अध्यक्ष यशवंत किल्लेदार, नगरसेवक भास्कर शेट्टी, नगरसेवक जोसेफ कोळी, नगरसेवक मिलिंद वैद्य, नगरसेविका हर्षला मोरे, नगरसेविका आशा काळे, नगरसेविका शीतल गंभीर-देसाई, नगरसेविका अर्चना शिंदे आणि इतर कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. उदघाटन कार्यक्रमाचे संचलन सहायक उद्यान अधीक्षक रणजित नलगे यांनी केले.

 

दाखले, प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांशी संबंधित रखडलेली कामे लवकर मार्गी लागावीत आणि नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांत जावे लागू नयेत, यासाठी शिबिरात खास व्यवस्था करण्यात आली होती. शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.

 

शिबिरात नोंदणी व मुद्रांक, नळ जोडणी, वीज जोडणी, आधार सेवा केंद्र, कर निर्धारण व संकलन, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, शिधापत्रिका वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र या सेवांसाठी स्वतंत्र व्यवस्था होती. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi