मनोरा आमदार निवास प्रकल्पाचे काम एल अँड टी कंपनी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने काम करीत आहे. आराखड्यापासून प्रकल्प हस्तांतरणापर्यंतची कामे तसेच हस्तांतरणानंतर सहा महिन्यांचे संक्रमणकालीन संचालन व देखभाल यांचा कंत्राटात समावेश आहे. प्रकल्पात एक तळघर, पार्किंगचे सहा स्तर आणि सातव्या स्तरावर पोडियम असेल. दोन्ही मनोरे १५, २२ आणि २९ व्या मजल्यांवर जोडपुलांनी जोडले जातील. अग्निसुरक्षा निकषांनुसार खालचे दोन जोडपूल बाजूंनी खुले राहतील, तर सर्वोच्च जोडपुलाच्या स्तरावर सुविधा क्षेत्राचे नियोजन केले आहे. सर्व कामे मंजूर आराखडा आणि लागू नियमांनुसारच करण्यावर भर देण्यात आला आहे, असे सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले.
मंत्रालय शेजारी बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या कामाच्या प्रगतीचाही यावेळी भोसले यांनी आढावा घेतला. या इमारतीचे बांधकाम धीम्या गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे कडक सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच हे काम करताना दर्जा राखण्याचेही निर्देशही दिले.
यावेळी मंत्री भोसले यांनी एअर इंडिया इमारतीमधील कामाचाही तसेच इमारतीवर उभारण्यात येणाऱ्या लोगोच्या संदर्भातही माहिती घेतली.
No comments:
Post a Comment