Thursday, 17 September 2026

शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबतप्रत्येक घरी दररोज पाणी

 प्रत्येक घरी दररोज पाणी


शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबत श्री. फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचं काम हे आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. निधीची कमतरता पडू दिली नाही. वेगाने काम चाललेलं आहे. अडचणी आपण दूर करतो आहोत. लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरी रोज पिण्याचं पाणी येईल. त्याकडे आपली वाटचाल ही सुरू झाली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.


 

घराघरातील मना मनांतील, जनजनातील गणपती रस्त्यावर? न्यायमूर्ती रानडे यांचा इशारा

 


मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे, कोकणातील पाणी आणणार

 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा

मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे,

कोकणातील पाणी आणणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (जिमाका)- मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही  पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी  कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु,असा शब्द आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

 

            मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत मुख्य शासकीय सोहळ्यास उपस्थित होते. श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण, मानवंदना, शहीदस्मारकास अभिवादन करण्यात आले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आज मोठ्या उत्साहात साजरा झाला.

 

            सिद्धार्थ उद्यान येथे आयोजीत या सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, खा.संदिपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, विधानपरिषद सदस्य आ.सतिष चव्हाण, आ. अंबादास दानवे, आ. सुहास शिरसाट, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, आ. प्रदीप जयस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. विलास भुमरे, आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, मुक्तिसंग्राम सैनिक, त्यांचे कुटूंबिय, शासकीय अधिकारी- कर्मचारी, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे

 ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे

            साठ वर्षांवरील नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, दृष्टी, श्रवण, अस्थिरोग, मानसिक आरोग्य आणि इतर वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आजारांसाठी तपासणी करावी. प्रत्येक आयुष्मान आरोग्य मंदिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. गरजेनुसार वृद्ध आणि उपशामक शुश्रुषा (जेरियाट्रिक आणि पॅलिएटिव्ह केअर) सेवांशी त्यांना जोडण्यात यावे.

 

प्राथमिक आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सेवा अनिवार्यपणे उपलब्ध असाव्यात, याबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित

 प्राथमिक आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सेवा अनिवार्यपणे उपलब्ध असाव्यात, याबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करावी. रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, वृद्धापकाळाशी संबंधित आजार आणि संसर्गजन्य आजारांच्या तपासणीसाठी नियमित शिबिरे आयोजित करावीत.

 

            उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यानंतरही उपचार सुरू न केलेल्या नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना उपचार व्यवस्थेशी जोडावे. आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक ॲलोपॅथी, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले.

शून्य ते दोन वर्षे वयोगटावर विशेष लक्ष

 शून्य ते दोन वर्षे वयोगटावर विशेष लक्ष

            बालकांची सर्वाधिक शारीरिक आणि बौद्धिक वाढ शून्य ते दोन वर्षे या कालावधीत होत असल्याने या वयोगटासाठी विशेष कृती आराखडा तयार करावा. कुपोषण, अॅनिमिया, जन्मजात आजार यांचे लवकर निदान करून आवश्यक उपचार तत्काळ सुरू करावेत. पोषण पुनर्वसन केंद्रांशी समन्वय साधून उपचारासाठी निश्चित केलेल्या प्रत्येक बालकाचा पाठपुरावा करण्यात यावा.

 

            राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणीमध्ये आढळून आलेल्या बालकांवर शंभर टक्के उपचार पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि आश्रमशाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची नियोजित वेळेत आरोग्य तपासणी पूर्ण करावी. अंगणवाडी आणि शाळांमधील तपासणीची माहिती डिजिटल प्रणालीवर नोंदवून उपचार पूर्ण होईपर्यंत प्रत्येक बालकाचा मागोवा घ्यावा.

 

            प्राथमिक आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सेवा अनिवार्यपणे उपलब्ध असाव्यात, याबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करावी. रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, वृद्धापकाळाशी संबंधित आजार आणि संसर्गजन्य आजारांच्या तपासणीसाठी नियमित शिबिरे आयोजित करावीत.

सेवा संकल्प अभियानात राज्यातील सर्व जनतेची आरोग्य तपासणी करा.

 सेवा संकल्प अभियानात राज्यातील सर्व जनतेची आरोग्य तपासणी करा.

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

  • ॲनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी राज्यव्यापी अभियान राबवावे.
  • राज्यात १४४० डॉक्क्टरांची भरती
  • आरोग्य संस्थांच्या सेवांचे केंद्रीय नियंत्रण कक्षातून नियमित संनियंत्रण

 

            मुंबई, दि १६:-  सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणीसह अॅनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा, शालेय विद्यार्थ्यांची तपासणी आणि उपचारांचा पाठपुरावा यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना  सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. आरोग्य संस्थांतील सेवांचे नियमित संनियंत्रण, जनआरोग्य समित्यांचा सहभाग, रुग्णवाहिका सेवेचे बळकटीकरण तसेच वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता यावर विशेष भर देण्यात यावा असेही त्यांनी सांगितले.

 

            आरोग्यभवन येथे सेवा संकल्प अभियानात राबविण्यात येणा-या उपक्रमांची मंत्री आबिटकर यांनी माहिती घेतली त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपूण  विनायक, आरोग्यसेवा डॉ. संजय काटकर, नागरी सेवा आयुक्त डॉ. सुनील भाकरे उपस्थित होते.

 

            राज्यातील ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी तपासणी, उपचार आणि नियमित संनियंत्रणावर भर देत विशेष अभियान राबवावे. गर्भवती महिला, शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके, शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य द्यावे. यासाठी सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास आणि आदिवासी विकास विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आले.

 

            राज्यातील ॲनिमियाची स्थिती, लोहयुक्त औषधांचा पुरवठा, रुग्णांकडून औषधांचे सेवन आणि उपचारानंतरची प्रगती यांचे आरोग्य संस्थानिहाय संनियंत्रण करण्यात यावे. मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या ॲनिमियाने ग्रस्त गर्भवती महिलांसाठी फेरिक कार्बोक्सिमाल्टोजउपचाराच्या वापराबाबत तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रमाणित मार्गदर्शक सूचना तयार करण्याचा प्रस्ताव सादर करावा. उपचाराबरोबरच पोषणविषयक मार्गदर्शन आणि नियमित हिमोग्लोबिन तपासणीवर भर द्यावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

 

            आरोग्य सेवेतील मनुष्यबळाची कमतरता पूर्ण करण्यासाठी राज्यात १४४० डॉक्टरांची भरती, तसेच दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी उत्तरदायित्व ठरणे आवश्यक आहे.  १५ हजार आरोग्य समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य अभियान राबवावे असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi