Thursday, 17 September 2026

गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे मत्स्यालय नवीन आकर्षण

 गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे मत्स्यालय नवीन आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक तसेच जिल्ह्यातील पर्यटनविकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. मत्स्यालयाचे बाह्य व अंतर्गत स्वरूप, माशांच्या टाक्यांची मांडणी आणि पर्यटकांसाठीच्या सुविधा आकर्षक व आधुनिक असाव्यात, याबाबत मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

 

            या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांनी आवश्यक समन्वय साधून पुढील कार्यवाही जलदगतीने करावी. वन विभागाशी संबंधित बाबींवर वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले.

 

  

गडचिरोलीतील मत्स्यालयाची उभारणी अत्याधुनिक व आकर्षक पद्धतीने करा

 गडचिरोलीतील मत्स्यालयाची उभारणी अत्याधुनिक व आकर्षक पद्धतीने करा

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

  • पर्यटनवाढीला चालना देणारा प्रकल्प गतीने साकारण्याचे निर्देश

 

            मुंबई, दि. १६ : गडचिरोली जिल्ह्यातील सेमाना येथे प्रस्तावित मत्स्यालयाची उभारणी अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि आकर्षक पद्धतीने करून ते पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरेल, याची विशेष काळजी घ्यावी. पारंपरिक पद्धतीचे मत्स्यालय न उभारता पर्यटकांना वेगळा अनुभव देणाऱ्या संकल्पनेतून या प्रकल्पाची उभारणी करावी. या प्रकल्पामुळे गडचिरोलीच्या पर्यटनाला चालना मिळणार असल्याने त्याच्या उभारणीची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 

            मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात गडचिरोली जिल्ह्यातील सेमाना येथे प्रस्तावित मत्स्यालयाच्या उभारणीसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी प्रस्तावित मत्स्यालयाच्या आराखड्याचे आणि संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले.

 

            सेमाना येथे सुमारे एक ते सव्वा एकर जागेत हे मत्स्यालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. या मत्स्यालयात सुमारे ५४ अॅक्रेलिक टाक्या उभारण्यात येणार असून, त्यामध्ये ८८ पेक्षा अधिक प्रजातींचे गोड्या पाण्यातील शोभिवंत मासे ठेवण्यात येणार आहेत. विविध प्रजातींच्या गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांचा समावेश असलेल्या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पाचे सादरीकरण आर. आर. मत्स्यालय सल्लागार संस्था यांच्या वतीने करण्यात आले.

मोतीबिंदूमुळे येणारे टाळता येण्याजोगे अंधत्व दूर करण्यासाठी व्यापक स्वरूपात

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मोतीबिंदूमुळे येणारे टाळता येण्याजोगे अंधत्व दूर करण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न सुरू आहेत. मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रहे केवळ शासकीय अभियान न राहता प्रत्येक पात्र नागरिकाला वेळेत उपचार मिळवून देणारे प्रभावी आरोग्य अभियान म्हणून राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. निर्धारित कालावधीत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्ण करून २०२७ पर्यंत मिशन यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

            मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा हा अनुशेष निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येईल, असा विश्वास डॉ. रवी चव्हाण यांनी व्यक्त केला असून, राज्याचे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

राज्यातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील पात्र रुग्णांपर्यंत मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया सुविधा प्रभावीपणे

 राज्यातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील पात्र रुग्णांपर्यंत मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया सुविधा प्रभावीपणे पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. उपलब्ध मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधा व साधनसामग्रीचा योग्य वापर करून शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात येणार असून, विविध शासकीय व आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय साधून अनुशेष कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मोतीबिंदूमुळे येणारे टाळता येण्याजोगे अंधत्व दूर करण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न सुरू आहेत. मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रहे केवळ शासकीय अभियान न राहता प्रत्येक पात्र नागरिकाला वेळेत उपचार मिळवून देणारे प्रभावी आरोग्य अभियान म्हणून राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. निर्धारित कालावधीत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्ण करून २०२७ पर्यंत मिशन यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

            मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा हा अनुशेष निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येईल, असा विश्वास डॉ. रवी चव्हाण यांनी व्यक्त केला असून, राज्याचे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

 मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

डॉ. रवी चव्हाण यांची राज्याचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

 

            मुंबई, दि. : नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून विविध आरोग्यविषयक योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वयस्क नागरिकांमध्ये मोतीबिंदूमुळे निर्माण होणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशनअधिक प्रभावीपणे राबविण्यावर शासनाने विशेष भर दिला आहे. या अनुषंगाने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरचे अधिष्ठाता व नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. रवी चव्हाण यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया कार्यक्रमासाठी राज्याचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

            मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता आणि त्यावरील उपाययोजनांसाठी सन २०१७ पासून मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशनसुरू करण्यात आले असून, सन २०१८ मध्ये या मिशनची नव्याने सुरुवात करण्यात आली. राज्यातील एकही पात्र नागरिक उपचाराअभावी मोतीबिंदूमुळे दृष्टिहीन राहू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिशनची व्याप्ती वाढवून शस्त्रक्रियांचा अनुशेष नियोजनबद्ध पद्धतीने दूर करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या २०२७ पर्यंत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रहे उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य करण्यासाठी राज्य शासनाने शस्त्रक्रियांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे.

            राज्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा वाढता अनुशेष लक्षात घेऊन राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रलंबित असलेल्या सुमारे २८ ते ३० लाख शस्त्रक्रियांचा अनुशेष आगामी तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शस्त्रक्रियांची संख्या वाढविणे, विविध यंत्रणांमध्ये सुसूत्रता निर्माण करणे तसेच कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ. रवी चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्याबरोबरच अध्यात्मिक ठिकाणे,

 कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्याबरोबरच अध्यात्मिक ठिकाणे, स्थानिक कला, संस्कृती, खाद्यपरंपरा, वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांचे प्रभावी सादरीकरण करण्यावरही भर द्यावा. त्यासाठी विविध माध्यमांसाठी स्वतंत्र आशय निर्मिती, साहित्य आणि सोशल मीडिया मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करावे.

 

            कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन विविध पायाभूत सोयीसुविधांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी. चुकीच्या बाबी, अफवांचे तातडीने खंडन करावे, अशाही सूचनाही त्यांनी दिल्या.

 

            कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती दिली.

 

            बैठकीनंतर महासंचालक श्री. सिंह यांनी रामकुंड परिसराला भेट देत पाहणी केली. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भाविकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, प्रमुख स्थळांचे माध्यमीय सादरीकरण आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची त्यांनी माहिती घेतली.

१ जानेवारी २०११ पूर्वी रहिवास क्षेत्रात अथवा शासकीय जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र

 १ जानेवारी २०११ पूर्वी रहिवास क्षेत्रात अथवा शासकीय जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांना प्रचलित शासन निर्णय आणि निकषांनुसार पट्टे देण्याचा कार्यक्रमही अभियानांतर्गत राबवावा. अभियानाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक समाजमाध्यम प्रभावकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करावी, अशा सूचनाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

 

Featured post

Lakshvedhi