Monday, 6 September 2021

 कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

·       गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांचा घेतला आढावा

 

          मुंबई, दि. 6 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

            आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अपर पोलीस महासंचालक (महामार्ग वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री. देबडवार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता,  सातारा, भुईंज, शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले.

            दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याची घोषणा करतानाच या वाहनांसाठी स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही यावेळी श्री. शिंदे यांनी दिले.  मुंबई-पुणे, पुणे-सातारा, मुंबई-गोवा या महामार्गावरील पथकर नाक्यांवर अधिकचे मनुष्यबळ नेमणूक करुन गणेशभक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने पथकर नाक्यांवर भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

            पथकर नाक्यांवर गणेशभक्तांशी वाद घालू नका, पथकर सवलतीचे स्टीकर्स उपलब्ध करुन देण्याबरोबर पथकर नाक्यांवर रुग्णवाहिका, जलद प्रतिसाद वाहने, जेसीबीबरोबरच पुरेसे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोविडचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

कोकणात जाणाऱ्या मार्गावर पोलीस तैनात- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

            कोकणात जाणाऱ्या मार्गावर स्थानिक पोलीसांबरोबरच महामार्ग वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, वाहतूक खोळंबू नये यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

            या बैठकीस ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, परिवहन, एसटी महामंडळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आदींचे वरिष्ठ अधिकारी तसेच पथकर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांची आणि सुविधांची माहिती यावेळी दिली.

००००

 अंकनाद स्पर्धेतून मुलांच्या प्रतिभेला वाव

- सुभाष देसाई

·       राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचे पारितोषिक वितरण

 

            मुंबई, दि. 6 : राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात पार पडला. यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित या उपस्थित होत्या. 

            शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था तसेच मॅप एपिक कम्युनिकेशन्स आणि राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचे आय़ोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील 7 गटातील प्रातिनिधिक 7 विजेत्यांना श्री.देसाई यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

            या स्पर्धेसाठी राज्यभरातून 1382 स्पर्धकांनी नोंदणी केली होती. यशस्वी विद्यार्थ्याना प्रत्येक गटात राज्य पातळीवर रुपये 11 हजार, 7 हजार,  5 हजार अशी पहिल्या 3 क्रमांकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे पारितोषिके म्हणून देण्यात आली.

            भारतीय संस्कृतीतील चांगल्या परंतु काळाच्या ओघात मागे पडलेल्या गोष्टींना उजाळा देण्याचा प्रयत्न अंकनाद पाढे स्पर्धेतून होत आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमांतून मराठी भाषेचे वैभव पुढे येत असल्याने शासन अशा उपक्रमास प्रोत्साहन देत आहे. गणितासारखा भीती वाटणारा विषय अंकनादच्या उपक्रमातून नादमधूर होत आहे. गणिताच्या वाटेला जे जात नाहीत, त्यांनाही हा प्रवास आवडायला लागेल. त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळेल, असे मराठी भाषा मंत्री श्री. देसाई म्हणाले.

            अभिनेत्री चिन्मयी सुमीत म्हणाल्या, ' ताल,  नाद याबरोबर गणिताचा प्रवास पुढे जात आहे,  हे महत्वाचे आहे. यशस्वी व्हायचे असेल तर पाढयांना पर्याय नाही. मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय या शासनाने घेतला ही राज्यासाठी महत्वाची बाब आहे.

            पारितोषिक विजेते :  स्वराज कुलकर्णी ( प्रथम क्रमांक,  बाल गट ),  कैवल्य खेडेकर ( प्रथम क्रमांक, इयत्ता दुसरी-तिसरी गट), शाश्वत कुलकर्णी (द्वितीय क्रमांक, इयत्ता दुसरी- तिसरी गट ),  सृष्टी कुलकर्णी ( प्रथम क्रमांक,  इयत्ता सहावी सातवी गट ), दामोदर चौधरी (द्वितीय क्रमांक,  इयत्ता सहावी-सातवी गट ), कृतीका किणीकर ( प्रथम  क्रमांक, इयत्ता आठवी ते दहावी गट ),  दामोदर चौधरी ( प्रथम,  खुला गट ) यांना गौरविण्यात आले.

            यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी, संचालक पराग गाडगीळ, मराठी काका उर्फ अनिल गोरे, समीर बापट,  निर्मिती नामजोशी,  वैशाली लोखंडे, रसिका सुतार,  पार्थ नामजोशी उपस्थित होते

 गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे

मुख्यमंत्र्यांचे राज्यातील पक्ष - संघटनांना कळकळीचे आवाहन

·        जनतेचे आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू

·        कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती बिघडवू शकते

 

            मुंबई, दि. 6 :  कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे.

            राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू.

तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणतात की, 'हे उघडा ते उघडा' या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.

            मला वारंवार आपणांस  हे आवाहन एवढ्याचसाठी करावे लागते आहे, कारण कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

            दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते.

            महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. नव्हे नव्हे, कोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केलीय. अमेरिकेत तिसऱ्या लाटेने जीवन अस्ताव्यस्त केले. चीनही विळख्यात सापडलाय. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज ३०,००० नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.  सरकार सुविधा निर्माण करील, पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा असेही मुख्यमंत्री आवाहनात म्हणतात.

0000

 परवा चर्चा करताना आई म्हणाली, 

अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. ते दारू न 

पीताही दारु पिल्याचा अभिनय किती 

सुरेख करतात.


आता आईला कोण सांगणार --- 

दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय

 करण्यापेक्षा, 


दारु पिऊन, न पिल्याचा अभिनय करण किती अवघड असते ते ! 


 अखिल भारतीय श्रावण संपल्यावर बसू संघटना 😂😂😂😁😁😁😃😃

 #ब्राह्मण व्यवसाय संघ 

#रत्नागिरी 

#तेजस खरे 8275442741

दिनांक २४/०८/२०२१ 


पणती मॉडेल नंबर १.


आता गणपती /दिवाळी सजावटीसाठी पटापट विद्युत उर्जे शिवाय उत्कृष्ट रोषणाई करा.


रिटेल किंमत : ५०/-रुपये प्रति नग (उद्पादन भारता मध्ये बनविलेले )


होलसेल किंमत :४०/प्रति नग( ५० नगा साठी)


होलसेल किंमत :३५/प्रति नग( १०० नगा साठी)


कुरिअर चार्जेस वेगळे लागू होतील. 


पाण्यावर पणती पेटविणे हा  साक्षात साई बाबा यांनी चमत्कार साऱ्या विश्वाला दाखविला होता.


पण त्याच आधारे एक विशिष्ट कौशल्य वापरून आम्ही तयार करून आपल्यासाठी आणत आहोत पाण्यावर पेटणारी पणती.


ज्या पणती मध्ये फक्त आपणास  पुरेसे पाणी ओतायचे आहे,  आणि आपली पणती ज्योती सकट प्रखर  पेटती होणार.


आमच्या पणतीचे फायदे :- 


१) कापूस वातीची गरज नाही.

२) तेलाची गरज नाही.

३) हवेवर सुद्धा पणती बंद होणार नाही.

४) पुरेसे पाणी  पणती मध्ये ओतल्यावर पणती पेटणार.

५) पाणी ओतून दिल्यावर पणती बंद होईल.

६) उपयोग नसताना पणती मधील पाणी ओतून पूर्णपणे पाण्याचा ओलावा साफ करून बॉक्स मध्ये पॅक करून ठेवणे.

७) सजावट आणि  डेकोरेशन साठी उत्तम पर्याय.

८) पूर्णपणे टिकावू आणि हाताळण्यासाठी सोप्पे.

९) कसलाही धोका नाही.

१०)विद्युत प्रवाह ची गरज नाही.

११) महत्वाचे म्हणजे हे संपूर्णपणे भारता मध्ये बनलेले उत्पादन आहे.


लगेच ऑर्डर देण्यासाठी गुगल पे

तेजस खरे 8275442741

 🙏 परेल, मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा रुग्ण 24 तासाच्या आत घेऊन जाणे ) या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो, रुग्णाच्या मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये  ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

जगभरात काही ठराविक अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे (न्युरोसर्जन) हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर  मशीनीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

 💐🙏🏻💐🙏🏻💐👍👌

माहीती सर्वाना कळवा फायदा होईल .

 राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा

असे नाव देण्यात येणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबई, दि. 2 : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी काळाच्या पुढे जाऊन मराठी रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे काम केले आणि त्यामुळेच राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा असे नाव देण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष वर्षा धाबे, प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपूरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश लेणेकर,महासचिव प्रमिलाताई भिसे, कोषाध्यक्ष शाम वानखेडे, आयोजन समिती प्रमुख शिवराज शिंदे, प्रसिध्दी प्रमुख जयप्रकाश पाटील, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, केशवराव भोसले यांच्या नावाने नाटक आणि संगीत क्षेत्रातील कर्तृत्ववान कलाकरांसाठी राज्य पुरस्कार सुरु करण्याबाबत शासन विचार करेल. मात्र तत्पूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रने याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव, मार्गदर्शक तत्वे याबाबतची सांस्कृतिक कार्य विभागाला सादर करावी. संगीत नाटक क्षेत्रातील होतकरु विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याबाबतही विचार करण्यात येईल.

            संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम शासकीय पातळीवर करण्यात यावेत याबाबत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागाला कळविण्यात येईल. संगीतसूर्य केशवराव भोसले कला, साहित्य आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याबाबतही विभागामार्फत विचार करण्यात येईल. येत्या 4 ऑक्टोबर 2021 रोजी नांदेड येथे होणाऱ्या सांगता कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi