बालसंगोपन आणि घरकुल सुगम्यतेसाठी मदत
दारिद्र्यरेषेखालील आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक कायमस्वरूपी दिव्यांगत्व असलेल्या मातेला शून्य ते पाच वयोगटातील दोन हयात मुलांच्या संगोपन व पोषणासाठी दरवर्षी कमाल २० हजार रुपये मिळतील. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या शिफारशीनंतर ही रक्कम संबंधित पालकाच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
दिव्यांगांना यापूर्वी वितरित केलेल्या घरकुलात सुगम्य शौचालय किंवा कमोड बांधकाम, दुरुस्ती आणि अन्य सुगम्यता कामांसाठी एकदाच कमाल २५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. शासकीय शाळा आणि महाविद्यालयांत दिव्यांग मुला-मुलींसाठी विशेष सुगम्य शौचालये, रॅम्प आणि आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी नवीन बांधकामाला अडीच लाख रुपये, तर दुरुस्तीसाठी दीड लाख रुपयांपर्यंत निधी देता येणार आहे
.
No comments:
Post a Comment