Thursday, 1 October 2026

मुंबई शहरात ९ वा राष्ट्रीय पोषण माह उत्साहात संपन्न

 मुंबई शहरात ९ वा राष्ट्रीय पोषण माह उत्साहात संपन्न

 

मुंबई, दि. १ : महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ९ व्या राष्ट्रीय पोषण माहचे आयोजन करण्यात आले होते.  या अंतर्गत माता, बालके, किशोरवयीन मुली तसेच नागरिकांमध्ये पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम मुंबई शहरात राबविण्यात आले.

 

मुंबई शहरातील विविध बाल विकास प्रकल्पांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण व आरोग्य जनजागृती, बालकांच्या वाढीचे निरीक्षण, पौष्टिक आहाराचे महत्त्व, स्थानिक पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन, गर्भवती व स्तनदा मातांसाठी आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, तसेच किशोरवयीन मुलींसाठी पोषण व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच पोषणविषयक संदेश, रॅली, शपथ, चर्चासत्रे, पालक बैठका आणि माहितीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi