Thursday, 1 October 2026

पोषण माहाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (पीएमएमव्हिवाय) बाबतही विशेष जनजागृती

 पोषण माहाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (पीएमएमव्हिवाय) बाबतही विशेष जनजागृती करण्यात आली. पात्र गर्भवती व स्तनदा मातांना योजनेची माहिती देऊन नोंदणी व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविणे, नोंदणीस प्रोत्साहन देणे तसेच उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

 

अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांचे वजन व उंची घेऊन त्यांच्या वाढीचे नियमित निरीक्षण करण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पौष्टिक खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. पोषण ट्रॅकर तसेच विविध पोषणविषयक शासकीय योजनांबाबतही लाभार्थी व पालकांना माहिती देण्यात आली.

 

पोषण हा केवळ एका विभागाचा विषय नसून कुटुंब, समाज आणि शासन यांच्या सामूहिक सहभागातूनच सुदृढ व कुपोषणमुक्त समाजाची निर्मिती शक्य आहे, हा संदेश विविध उपक्रमांच्या माध्यमातून देण्यात आला. या अभियानात महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच लाभार्थी माता, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi