Monday, 12 October 2026

जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन,पशुधनासाठी चारा-पाण्याचे नियोजन

 जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन

            दुष्काळी परिस्थितीत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जलसाठ्यांतील गाळ काढणे, दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येतील. यापूर्वी 25 हजार गावांमध्ये राबविलेल्या कामांमुळे 15 ते 17 टक्के पाणी तूट असतानाही त्या भागांना दिलासा मिळाला. सॉफ्टवेअर आणि ॲपच्या माध्यमातून अशा कामांची पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

 

पशुधनासाठी चारा-पाण्याचे नियोजन

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विविध जिल्ह्यांत उपलब्ध चाऱ्याचा साठा 90 ते 120 दिवसांपर्यंतचा आहे. मातीमध्ये ओलावा असलेल्या पाणलोट क्षेत्रांत चारा उत्पादन वाढविण्यात येईल. उपलब्ध चारा शासनाने घोषित केलेल्या दराने खरेदी करून त्याच्या साठवणुकीची व्यवस्था केली जाईल. आवश्यकता भासल्यास चांगला पाऊस झालेल्या अन्य राज्यांतूनही चारा उपलब्ध करण्याचा विचार केला जाईल. पशुधन वाचविण्यासाठी गरजेनुसार चारा छावण्या आणि पशू छावण्यांचा पर्याय स्वीकारण्यात येईल. ग्रामीण भागातील नागरिकांना जलसंधारणाच्या कामांमध्ये सहभागी करून घेण्यात येईल. माथा ते पायथा या संकल्पनेनुसार विद्यमान जलसंधारण संरचनांची दुरुस्ती तसेच नवीन संरचनांची निर्मिती लोकसहभागातून केली जाईल. त्यामुळे गावांमध्ये रोजगार निर्माण होण्याबरोबरच नागरिकांना मदत व दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

            राज्य शासन केंद्र सरकारच्या निकषांनुसार आकडेवारीवर आधारित सविस्तर आणि नेमके निवेदन सादर करणार आहे. केंद्रीय कृषीमंत्र्यांनी आगाऊ निवेदन सादर करण्याबाबत संपर्क केला आणि ते आम्ही सादर केले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आंतरमंत्रालयीन गटाची बैठक लवकर घेऊन मदत देण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले. पीक विम्याचे संरक्षण तुलनेने कमी असले तरी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ लवकर मिळवून देण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्याने प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

            यावेळी राज्य शासनाच्या वतीने मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंघल, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन नैनुटिया, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, रोजगार हमी योजना विभागाचे सचिव अप्पासो धुळाज, जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किरण पाटील, प्रधान मुख्य वन संरक्षक एम.श्रीनिवास राव यांनी दुष्काळासंदर्भात सद्यस्थिती सांगून संबंधित विभागांच्या उपाययोजनांबाबतची माहिती दिल


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi