Monday, 12 October 2026

शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन यावर भर - • तंत्रज्ञानाधारित दुष्काळी मदतीचे नियोजन याला प्राधान्य • केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

 शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य,

पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन यावर भर

-

•        तंत्रज्ञानाधारित दुष्काळी मदतीचे नियोजन याला प्राधान्य

•         केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

 

            मुंबई, दि. 11 - राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी रोजगारनिर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबतच्या बैठकीत दिली. केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागातील परिस्थितीबाबतचा अहवाल केंद्र शासनाला सादर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

            केंद्रीय पथकाने अत्यंत विस्तृत दौरा करून तळागाळापर्यंत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यामुळे नागरिकांमध्ये आपल्या अडचणी समजून घेतल्याचे समाधान निर्माण झाले असल्याचे या वेळी केंद्रीय पथकाला सांगितले. केंद्रीय पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र शासनापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi