Monday, 12 October 2026

उपलब्ध शासकीय जमिनीचा मत्स्यव्यवसायासाठी परिणामकारक वापर करा –

 उपलब्ध शासकीय जमिनीचा मत्स्यव्यवसायासाठी परिणामकारक वापर करा

–मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

  • कोकणातील खाऱ्या व गोड्या पाण्यातील मत्स्य बीज केंद्रांच्या प्रस्तावांना गती
  • वाशिष्ठीतील गाळ, राष्ट्रीय जलमार्ग व नव्या ड्रेजरच्या उपलब्धतेचा आढावा

मुंबई, दि. १२ : कोकणात खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी स्वतंत्र मत्स्य बीज केंद्रे उभारण्याच्या  प्रस्तावांना गती द्यावी. जलसंपदा महामंडळाच्या अखत्यारीतील जागेबाबत संबंधित स्तरावर पाठपुरावा करून सकारात्मक निर्णयानंतर महामंडळाच्या संचालक मंडळाचा ठराव सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

आमदार शेखर निकम यांनी चिपळूण –वशिष्ठी खाडीतील गाळ काढणे आणि रत्नागिरीमध्ये शासकीय जागेवर मत्स्यबीज केंद्र उभारण्यासाठी उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी संबधित अधिका-यांना निर्देश दिले.

कोकणात मोठ्या क्षमतेचे मत्स्य बीज केंद्र आवश्यक असून त्यासाठी प्रस्तावित दोन हेक्टर क्षेत्र अपुरे असल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले. अशा केंद्रासाठी किमान पाच हेक्टर, तर शक्य असल्यास आठ ते दहा हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. खाडीलगत सुमारे ४० एकर शासकीय जमीन उपलब्ध असून तिचा खाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी उपयोग करता येऊ शकतो. रासायनिक घटकांचा संभाव्य परिणाम तपासण्यासाठी या जागेची तांत्रिक पाहणी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी कालव्यालगत जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जागेचा प्रस्ताव पुढे आला आहे. महामंडळाच्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी नियमानुसार ठराव आवश्यक असल्याने संबंधित प्रस्तावाचा पाठपुरावा करून तो संचालक मंडळासमोर ठेवावा. जमीन उपलब्ध झाल्यानंतर मत्स्य बीज केंद्राच्या कामाला सुरुवात करता येईल, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi