Tuesday, 13 October 2026

परदेशी रुग्णांसाठीही पॅकेजची पारदर्शकता

 परदेशी रुग्णांसाठीही पॅकेजची पारदर्शकता

वैद्यकीय उपचारांसाठी तसेच आयुष उपचारांसाठी मेडिकल किंवा आयुष व्हिसावर भारतात येणाऱ्या परदेशी रुग्णांना उपलब्ध उपचार पॅकेजचे दरही ठळकपणे प्रदर्शित करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केंद्राने केले आहे. यामुळे परदेशी रुग्णांना उपचारांचा खर्च समजून घेऊन निर्णय घेणे सोपे होईल. तसेच दर आणि बिलिंगसंदर्भातील तक्रारी कमी होण्यास मदत होऊन वैद्यकीय व आयुष उपचारांसाठी विश्वासार्ह गंतव्य म्हणून भारताची प्रतिमा अधिक बळकट होईल.

 

संबंधित अधिकाऱ्यांनी वैद्यकीय संस्थांना आवश्यक सूचना देऊन लागू नियमांनुसार दरपत्रके स्पष्टपणे दिसतील आणि सहज उपलब्ध होतील, याची खात्री करावी, असेही केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्राद्वारे नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi