Thursday, 8 October 2026

एमपीएससी आंदोलनाबाबत सरकारची भूमिका विद्यार्थीहिताची

 एमपीएससी आंदोलनाबाबत सरकारची भूमिका विद्यार्थीहिताची

            एमपीएससी  विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की  विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या पाचही मागण्यांवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांवरील चौकशीसंदर्भात न्यायालयीन चौकशी करण्यास सरकारने तयारी दर्शविली आहे. चौकशीत गैरप्रकार किंवा गैरवर्तन आढळल्यास संविधानातील कलम ३१७ नुसार पुढील कार्यवाही करण्याची भूमिकाही सरकारने स्पष्ट केली आहे.

 

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षामध्ये पारदर्शकता वाढविण्यासाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, माजी विद्यार्थी आणि अन्य संबंधित घटकांशी संवाद साधून सुधारणा सुचविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाऐवजी आंदोलनाचा राजकीय वापर केला जात असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील पोलिसांनी आंदोलनादरम्यान अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली असून, विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi