Thursday, 8 October 2026

नागपूर विमानतळासाठी २७ एकर जागा हस्तांतराचा मार्ग मोकळा

 नागपूर विमानतळासाठी २७ एकर जागा हस्तांतराचा मार्ग मोकळा

            मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. नागपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीसाठी आवश्यक असलेल्या २७ एकर जागेचा प्रश्न या बैठकीत चर्चिला गेला. ही जागा सध्या भारतीय वायुदलाच्या ताब्यात आहे.

            नवीन टर्मिनलच्या कामासाठी आवश्यक जागा तातडीने हस्तांतरित करण्यास वायुदलाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. उर्वरित भागासाठी आवश्यक बांधकाम पूर्ण करून तो भागही पुढे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            बांधकामासाठी आवश्यक अवजड यंत्रसामग्रीच्या हालचालीसाठी वायुदलाच्या परिसरातील हेलिकॉप्टर पार्किंग व अन्य कार्यवाहीच्या अनुषंगाने आवश्यक परवानग्या देण्यासही संरक्षण मंत्रालयाने सहमती दर्शविली असून, त्यासाठी आवश्यक ‘एसओपी’ तयार करण्यात येणार आहे. यामुळे नागपूर विमानतळाच्या टर्मिनल प्रकल्पासाठी असलेले अडथळे दूर झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi