Thursday, 8 October 2026

काही प्रकरणांमध्ये जमिनीचे व्यवहार वरकरणी रीतसर खरेदी-विक्रीचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते अवैध सावकारीशी

 काही प्रकरणांमध्ये जमिनीचे व्यवहार वरकरणी रीतसर खरेदी-विक्रीचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते अवैध सावकारीशी संबंधित असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षतेने कार्यवाही करावी, अवैध सावकारीसंदर्भातील प्रलंबित प्रकरणांचा तातडीने अहवाल मागवून ही प्रकरणे गतीने निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करावा.अवैध सावकारीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या कार्यरत आहेत. या समित्यांना पोलीस प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य करावे. विशेषतः दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अवैध सावकारीला वाव मिळणार नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असेही  सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi