Sunday, 11 October 2026

महिला व बालविकास विभागासाठी राखीव तीन टक्के निधीपैकी एक टक्का निधी पायाभूत सुविधांसाठी, एक टक्का अंगणवाड्यांसाठी

 अनाथ बालकांच्या उच्च व तांत्रिक शिक्षणाचा संपूर्ण खर्च तसेच परीक्षा शुल्क शासनामार्फत भरण्याचा निर्णय १७ जुलै २०२५ रोजी घेण्यात आला. या निर्णयाचा ९९ हून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ झाला आहे. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख बालकांना दरमहा २ हजार २५० रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जात असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी परिषदेत दिली.


जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बालविकास विभागासाठी राखीव तीन टक्के निधीपैकी एक टक्का निधी पायाभूत सुविधांसाठी, एक टक्का अंगणवाड्यांसाठी b आणि एक टक्का बालकांच्या थेट कल्याणकारी उपक्रमांसाठी वापरण्यात येत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या तसेच रस्त्यावर भीक मागणाऱ्या बालकांसाठी २०२४-२५ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘मोबाइल स्क्वॉड’ प्रायोगिक उपक्रमातून सुमारे १० हजार बालकांपर्यंत पोहोचण्यात आले. त्यापैकी सुमारे तीन हजार बालकांना नियमित शाळेत दाखल करण्यात आले. हा उपक्रम राज्यातील ३९ हून अधिक महानगरपालिकांमध्ये विस्तारित करण्याचे नियोजन आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi