Monday, 5 October 2026

अलनिनोच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन; 16 ऑक्टोबर पासून 10% पाणीकपात - जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी आणि कोकण खोरे विकास

 अलनिनोच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन;

16 ऑक्टोबर पासून 10% पाणीकपात

- जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी आणि कोकण खोरे विकास महामंडळ )गिरीश महाजन यांचे निर्देश

 

मुंबई, दि. 5 : अलनिनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पर्जन्यमानात मोठी घट झाली असून राज्यातील जलसाठा मर्यादित आहे. या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंपदा विभागाने 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचे पाण्याचे धरणनिहाय व वापरनिहाय अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून 16 ऑक्टोबर 2026 पासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10% पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी आणि कोकण खोरे विकास महामंडळ ) गिरीश महाजन यांनी दिली.

 

2026 च्या खरीप हंगामातील 'ट्रिगर-1' लागू झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पुढील वर्षापर्यंत अलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आणि कठोर उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

 

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य

धरणे व जलाशयांमधील पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. बाष्पीभवन, गाळ व अनधिकृत उपसा विचारात घेऊन 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवले जाईल. याशिवाय, भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन प्रत्येक धरणात 10% अतिरिक्त आपत्कालीन बफर साठा राखीव ठेवला जाईल. अत्यंत गरज भासल्यास तांत्रिक तपासणी करून मृतसाठ्यातील  पाण्याचाही वापर केला जाईल.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi