स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना व सांडपाण्याचा पुनर्वापर
सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीनी 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात लागू करावी. पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे पूर्ण क्षमतेने चालवून प्रक्रिया केलेले पाणीच बागा, बांधकाम व धुलाईसाठी वापरावे.
शेती व सिंचनाचे नियोजन
पिण्याचे पाणी, जनावरे आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचे सिंचनासाठी वाटप होईल. प्रथम रब्बी हंगामातील भुसार व चारा पिकांना, त्यानंतर इतर रब्बी पिकांना आणि पाणी शिल्लक राहिल्यासच बारमाही पिकांना मंजुरी दिली जाईल. पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींवर भर दिला जाईल.
उद्योगांसाठी 30% पाणी पुनर्वापर बंधनकारक
औद्योगिक क्षेत्रातील वापरासाठी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे
अनधिकृत पाणी उपशावर होणार कडक कारवाई
धरणे, नद्या व कालव्यांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा तात्काळ रोखण्यासाठी महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाची संयुक्त पथके गस्त घालतील. दोषर्षीवर कारवाई करून बेकायदेशीर पंप व साहित्य जप्त केले जाईल.
No comments:
Post a Comment