Monday, 14 September 2026

खाणकाम अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत करण्यावर भर

 खाणकाम अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत करण्यावर भर

            मायनिंग डिव्हिजन बोर्डचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुमन यांनी खनिजे ही आधुनिक उद्योग, पायाभूत सुविधा आणि भारताच्या विकासाची पायाभूत गरज असल्याचे सांगितले. एआय, ऑटोमेशन, ड्रोन, सेन्सर्स आणि रिअल-टाइम खाण निरीक्षणामुळे खाणकाम अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शाश्वत करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

 

            खाण कामगारांची सुरक्षितता कोणत्याही उत्पादनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक महत्त्वाची आहे, असे स्पष्ट करत त्यांनी खनिज सुरक्षा ही विकसित भारताची पायाभूत गरज असल्याचे सांगितले.

 

            डब्ल्यूसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत शरद पांडे यांनी नागपूरला देशाची मायनिंग कॅपिटलम्हणून विकसित करण्याच्या उद्देशातून हे अधिवेशन आयोजित केल्याचे सांगितले. डब्ल्यूसीएलने १२ खाणींमध्ये १८ महत्त्वपूर्ण खनिजे आणि दुर्मीळ मृदा मूलद्रव्ये शोधून काढली असून, कोळशापलीकडे जाऊन महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्खनन व शुद्धीकरणाच्या दिशेने कंपनी विविधता आणत असल्याचे त्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi