Monday, 14 September 2026

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल

 भारतीय भाषांच्या सन्मानातूनच एक भारत, श्रेष्ठ भारतची संकल्पना साकार होईल

                                                                 -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

            हिंदी, मराठीसह सर्व भारतीय भाषांचा परस्पर आदर करण्याचा संकल्प करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

नवी मुंबईत हिंदी दिवस २०२६ आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ; विविध ॲप्स, पुस्तके आणि शब्दकोश उपक्रमांचे लोकार्पण

ठाणे,दि.14(जिमाका): भारतीय भाषांचे संवर्धन, सन्मान आणि विकास हा केंद्र शासनाचा प्रमुख आणि दृढ संकल्प असून सर्व प्रादेशिक भाषा या कमळाच्या विविध पाकळ्यांप्रमाणे सुंदर आहेत. या सर्व समृद्ध भाषांचा आदर राखत हिंदीला त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा मध्यमणीबनवूया, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी केले.

    वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटरमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीने आयोजित हिंदी दिवस २०२६आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उद्घाटन अत्यंत उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

     यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, खासदार नरेश म्हस्के, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार, राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्या, व्ही.एल. कांताराव, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंशज जॉयदीप चट्टोपाध्याय, मिलिंद प्रभाकर सबनीस हे मान्यवर उपस्थित होते.

     केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, राजभाषा संमेलने केवळ राजधानी दिल्लीपुरती मर्यादित न ठेवता देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेण्याचा केंद्र शासनाचा निर्णय यशस्वी ठरला असून, या उपक्रमांतर्गत हे सहावे संमेलन महाराष्ट्रात होत आहे.    

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi