उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धधम येथे जी. टी. जाधव यांच्या शेतात व व्याळा येथील सविता वासुदेव वाशिमकर यांच्या शेतात पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नैसर्गिक संकटाने हताश झालेल्या शेतक-यांना त्यांनी दिलासा दिला. ते म्हणाले की, शेतक-यांनी धीर सोडू नये. शासन त्यांच्यासोबत उभे आहे. येणारी दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतकरी बांधवांना भरघोस मदत करण्यात येईल. यासंबंधी कॅबिनेटमध्येही चर्चा झाली असून, लवकरच अधिसूचना काढण्यात येईल.
ते पुढे म्हणाले की, पावसात प्रदीर्घ खंड पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. तूर, सोयाबीन व इतरही पीकांचे नुकसान झाले. अशा वेळी सर्वांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment