शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही; जास्तीत जास्त मदत करणार
-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दुष्काळसदृश भागाची पाहणी
अकोला, दि. २३ : कमी पर्जन्यमान आणि पावसातील खंड यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र, शेतक-यांनी धीर सोडता कामा नये. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही; त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जिल्ह्यातील दुष्काळसदृश् परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बाळापूर तालुक्यातील धधम व व्याळा या गावांना भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार अनुप धोत्रे, आमदार संजय गायकवाड, आमदार किरण सरनाईक, महापौर शारदा खेडकर, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार विप्लव बाजोरिया आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment