माझगावमधील गणेश मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’
· गणेशोत्सवामध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती
मुंबई, दि. २४ : केंद्र शासनाने २०२९ पर्यंत नशामुक्त भारत संकल्प केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रालाही नशामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘ड्रग्ज फ्री मुंबई, ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ ही मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अमली पदार्थांविषयी जनजागृती महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमातून करण्यात येत आहे.
मुंबई शहरातील विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. लोकसंवाद उपक्रमाचा भाग म्हणून माझगाव परिसरातील विविध गणेश मंडळांसमोर भक्तगण, मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांना शासनाच्या योजना, उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली.
या उपक्रमात ‘नशामुक्त मुंबई, नशामुक्त महाराष्ट्र', इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना, अन्नातील भेसळ प्रतिबंध, पाणी बचत तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा याबाबत जनजागृती करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
No comments:
Post a Comment