विद्यापीठांनी उद्योग क्षेत्रासोबत भागीदारी वाढवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, इंटर्नशिप, शिकाऊ उमेदवारी, संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. माजी विद्यार्थ्यांचे जाळेही अधिक सक्षम करून त्यांचा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती, रोजगार, संशोधन आणि नवोन्मेषासाठी उपयोग करून घ्यावा, असे राज्यपाल वर्मा म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, आरोग्य, कृषी, सायबर सुरक्षा, शाश्वत विकास, ग्रामीण परिवर्तन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांतील संशोधनाला चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक विद्यापीठाने वार्षिक क्रीडा दिनदर्शिका तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एका क्रीडा किंवा शारीरिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. क्रीडा विद्यार्थ्यांना शिस्त, संघभावना आणि नेतृत्व शिकवते, असे राज्यपालांनी सांगितले.
विद्यापीठ परिसर सुरक्षित, निरोगी आणि अमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त ठेवण्यासाठी ‘नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत जनजागृती, समुपदेशन आणि सामाजिक उपक्रम राबवावेत. तसेच विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांनी गावे दत्तक घेऊन साक्षरता, डिजिटल शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कौशल्यविकास आणि सामाजिक नवोन्मेषाच्या माध्यमातून स्थानिक समुदायाशी जोडले जावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.
No comments:
Post a Comment