Friday, 11 September 2026

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे

राज्यपाल जिष्णु देव वर्मा

·         राज्यपालांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२७ वा दीक्षान्त समारंभ

 

            पुणे, दि. १०  : कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे जग वेगाने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.

 

            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२७ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते.  यावेळी कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलगुरू प्रा.डॉ. पराग काळकर , कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.

            राज्यपाल म्हणालेदीक्षान्त समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील विशेष क्षण असून या टप्प्यावर ज्ञानाचे रूपांतर जबाबदारीत आणि शिक्षणाचे नेतृत्वात होते. बदलत्या परिस्थितीत केवळ पदवी पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी आजीवन ज्ञानार्जन करत नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. शिक्षण हे केवळ रोजगाराचे साधन नसून समानता, सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हा सावित्रीबाई फुले यांचा विचार विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा, असे आवाहनी त्यांनी केले.

 

            राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून राज्यपाल वर्मा म्हणाले, बहुविषयक शिक्षण, कौशल्यविकास, संशोधन, नवोन्मेष, भारतीय ज्ञानपरंपरा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या बाबींना प्राधान्य द्यावे. डिजिटल प्रशासन आणि हरित उपक्रमांमुळे विद्यापीठ अधिक पारदर्शक, कार्यक्षम व शाश्वत होण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi