Friday, 11 September 2026

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन कामगिरीचा आढावा

   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन कामगिरीचा आढावा घेतला. विद्यापीठाशी संलग्न ८५९ महाविद्यालये व परिसंस्थांमध्ये साडेसात लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, ज्ञाननिर्मिती प्रयोगशाळेपुरती मर्यादित न राहता समाज, गाव, शेत आणि रुग्णालयांपर्यंत पोहोचविण्यावर विद्यापीठाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञाननिर्मिती, संशोधन, लोकाभिमुख तंत्रज्ञान, कौशल्यविकास, डिजिटल परिवर्तन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून विद्यापीठाला नवी उंची देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi