Saturday, 12 September 2026

केंद्र सरकारने निश्चित केलेले ‘टीबी मुक्त भारत’ हे उद्दिष्ट केवळ सरकारचे अभियान नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी

 केंद्र सरकारने निश्चित केलेले टीबी मुक्त भारतहे उद्दिष्ट केवळ सरकारचे अभियान नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका बजावणे आवश्यक आहे. विशेषतः तरुणांनी आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजामध्ये टीबीविषयी अचूक माहिती पोहोचवावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

 

तरुणांनी टीबीमुक्तीच्या यशोगाथांवर आधारित लघुपट, पोस्टर्स, पॉडकास्ट आणि सोशल मीडिया मोहिमा तयार करून जनजागृतीला नवे माध्यम द्यावे, असेही राज्यपालांनी सुचविले. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना हे या अभियानातील परिवर्तनाचे महत्वाचे दूत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

 

सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी अभियानामागची भूमिका स्पष्ट केली. कुलगुरु रवींद्र कुलकर्णी तसेच बंट संघ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्टी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi