मुंबईच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये विशेष जनजागृती करणे आवश्यक आहे. वेळेवर मिळणारी योग्य माहिती, निदान आणि उपचार हे टीबीचा प्रसार रोखण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
ही सामुदायिक पदयात्रा केवळ प्रतीकात्मक कार्यक्रम नसून समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. नागरिक स्वतः पुढाकार घेऊन जनजागृतीमध्ये सहभागी झाले, तर त्याचे रूपांतर व्यापक लोकचळवळीत होऊ शकते. या पदयात्रेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांपर्यंत ‘टीबीला घाबरू नका, वेळेवर तपासणी करा आणि पूर्ण उपचार घ्या’ हा संदेश पोहोचेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment