कौशल्य आधारित शिक्षण आत्मसात करावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मार्गदर्शनात तरुणांना केवळ पारंपरिक पदव्यांवर अवलंबून न राहता कौशल्य आधारित शिक्षण आत्मसात करण्याचे आवाहन केले. चर्मोद्योग आणि पारंपरिक कलांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून नवीन रोजगार निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विशेषतः महिलांनी तयार केलेल्या हस्तकला आणि हातमाग उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा अशीच कायम ठेवून देशाच्या आणि समाजाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, अशा शब्दांत केंद्रीय नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्याना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
000000
No comments:
Post a Comment