दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करणार
गडचिरोली पूरग्रस्तांना मदत देणार
नागपूर दिनांक 27: राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर तीन अंतर्गत मदत देण्यात येईल, दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती व शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
पर्जन्यमानाची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, या तालुक्यांमध्ये 12 उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेत पिकाच्या नुकसानीची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून दिली जाईल अशी ग्वाही देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या तालुक्यांचा समावेश झाला नाही अशा सर्व तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर तीन मध्ये समावेश करण्यात येईल.
No comments:
Post a Comment