Wednesday, 26 August 2026

वेगवान विकासाचे चेंज मेकर्स बना फक्त मुंबई नव्हे, संपूर्ण राज्य ग्रोथ इंजिन बनविणार

 वेगवान विकासाचे चेंज मेकर्स बना

फक्त मुंबई नव्हे, संपूर्ण राज्य ग्रोथ इंजिन बनविणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई दि २५: जगभर झपाट्याने विकास होत असून आपणही देश आणि राज्याच्या गतिशील विकासाचे चेंज मेकर्स बना असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्याला देशाचे ग्रोथ इंजिन बनविण्यासाठी सरकारने पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले. इकॉनॉमिक टाइम्स बिझनेस कॉनक्लेव्ह अँड अवॉर्ड्स २०२६ मध्ये ते बोलत होते.

महाराष्ट्राची विकासाची वाटचाल ही केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नसून ती आधुनिक, शाश्वत, जागतिक स्पर्धेत सक्षम आणि सर्वसामान्यांसाठी अनुकूल असावी, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi