Wednesday, 26 August 2026

विकास आणि पर्यावरणाचा समतोल

 विकास आणि पर्यावरणाचा समतोल

महाराष्ट्रासारख्या मोठ्या किनारपट्टीचा, विविध भौगोलिक परिस्थितीचा आणि वेगाने विकसित होणाऱ्या राज्यासाठी हवामान बदलाचे आव्हान गंभीर आहे. त्यामुळे विकासाचे नियोजन करताना पर्यावरण आणि हवामान बदलाचा विचार केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या हवामान कृती आराखड्यातही शाश्वत विकासासाठी अनुकूलन आणि उत्सर्जन कमी करण्याच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.

मुंबईसारख्या किनारी शहरात वाढती उष्णता, पूर, समुद्रपातळीतील वाढ आणि प्रदूषण यांसारख्या आव्हानांना सामोरे जाताना फ्लड कंट्रोल, कोस्टल प्रोटेक्शन, हरित क्षेत्र वाढविणे, रेनवॉटर मॅनेजमेंट, शाश्वत वाहतूक आणि तंत्रज्ञानाधारित नियोजनावर भर दिला जात आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi