नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाजवळील डेब्रिज (कामाचा कचरा) हटवून जागा मोकळी करण्याचे तसेच मेट्रोची कामे पूर्ण झाल्याने एमएमआरडीएने पालिकेला जागा हस्तांतरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सात रस्ता येथील मोनोरेल ब्रिज मेट्रो स्टेशनला जोडणीचे काम तातडीने पूर्ण करावे. पालिकेच्या वाहनतळांवर पे अँड पार्क स्थानिकांसाठी सवलतीच्या दरात मासिक पास उपलब्ध करून द्यावेत. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडचा नवीन सुधारित आराखडा तयार करावा, आदी सूचनाही उपसभापती सचिन अहिर यांनी केल्या.
वरळीतील परिसराचा विकास साधताना स्थानिक नागरिकांचे हित आणि पुनर्वसन सुरक्षित ठेवण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. बैठकीस महापालिकेचे संबंधित विभागाचे उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment