Saturday, 22 August 2026

वरळीतील नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात

 वरळीतील नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात

-उपसभापती सचिन अहिर

·        महापालिका आयुक्तांसोबत बैठक

 

मुंबई,दि.२१: वरळी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत आहेत. मात्र स्थानिक नागरिकांच्या मूलभूत नागरी समस्या आणि अडचणी तात्काळ मार्गी लावाव्यात असे निर्देश उपसभपती सचिन अहिर यांनी दिले.

 विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर त्यांच्या दालनात यासंदर्भात बैठक झाली. यावेळी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त, अश्विनी भिडे उपस्थित होत्या.

बैठकीत वरळीतील विविध प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. महापालिका आयुक्तांनी हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत आरोग्य व्यवस्था, वाहतूक कोंडी, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग आणि उड्डाणपुलांची जोडणी यांसारख्या नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वरळी धोबीघाट येथे प्रसुतिगृह आणि लहान मुलांचे विशेष रुग्णालय उभारावे. माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमी येथील सुविधांचे बळकटीकरण आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकासमोरील फूटपाथची कामे, कोस्टल रोड परिसरात उद्यानांची कामे तसेच देखभाल आणि सुशोभीकरण करण्याचे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi