Wednesday, 29 July 2026

टीबीबाबत समाजात असलेले गैरसमज आणि भीती दूर करण्याची गरज

 राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी टीबीबाबत समाजात असलेले गैरसमज आणि भीती दूर करण्याची गरज अधोरेखित केली. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी, शासनाकडून टीबीवरील उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. टीबीग्रस्त रुग्णांशी भेदभाव न करता त्यांच्याशी सहानुभूती, सन्मान आणि सहकार्याची भावना ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi