टीबीमुक्त भारतासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज
- राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि. २९ : ‘क्षयरोग (टीबी) हा केवळ वैद्यकीय विषय नसून समाजापुढील आर्थिक आणि सामाजिक आव्हान आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर तपासणी, नियमित उपचार आणि व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून 'टीबीमुक्त मुंबई' आणि 'टीबीमुक्त भारत' घडविण्यासाठी लोकचळवळ उभी करणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
मुंबई विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि भामला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री नारायण गुरु महाविद्यालय, चेंबूर येथे आयोजित 'टीबीमुक्त मुंबई' जनजागृती पदयात्रेला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून आयोजित या अभियानात हजारो एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाले.
No comments:
Post a Comment