आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे सक्षम डेटा सेंटरची गरज झपाट्याने वाढली : सलीम सय्यद
सबमर इंडियाचे एआय एआय डेटा सेंटर डिझाईन अँड बिल्डचे उपाध्यक्ष सलीम सय्यद यांनी 'सक्षम डेटा सेंटर व त्यांची आवश्यकता समजून घेणे'या विषयावर माहिती दिली.कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल सेवांच्या वाढत्या वापरामुळे जगभरात उच्च क्षमतेच्या डेटा सेंटरची मागणी वेगाने वाढत आहे. मोबाईलवरून जेवण मागवणे, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट, सरकारी सेवा किंवा क्लाऊडवर आधारित व्यवसाय असो, या प्रत्येक सेवेमागे डेटा सेंटर हा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.आता पारंपरिक डेटा सेंटरचे स्वरूप बदलत असून अधिक शक्तिशाली, र्जा-कार्यक्षम आणि अत्याधुनिक एआय डेटा सेंटर उभारण्यावर भर दिला जात आहे. विविध डिजिटल सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी डेटा सेंटरची भूमिका महत्त्वाची आहे.
सलीम सय्यद म्हणाले की, डेटा सेंटरची गुणवत्ता आणि विश्वासार्हता 'टियर' प्रणालीद्वारे मोजली जाते. टियर वन आणि टियर टु डेटा सेंटरमध्ये तुलनेने अधिक डाऊनटाईम असतो, तर टियर तीन डेटा सेंटरमध्ये वर्षभरात केवळ सुमारे १.६ तास सेवा खंडित होण्याची शक्यता असते. टियर चार हे डेटा सेंटर हे सर्वाधिक विश्वासार्ह मानले जाते. अशा केंद्रांमध्ये वर्षभरात केवळ काही मिनिटांचा डाऊनटाईम असतो. त्यामुळे बँका, शेअर बाजार, सरकारी यंत्रणा आणि महत्त्वाच्या वित्तीय संस्थांकडून टियर चार डेटा सेंटरला प्राधान्य दिले जाते. डिजिटल भारताच्या वाटचालीत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या युगात डेटा सेंटर ही केवळ तांत्रिक सुविधा नसून देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया बनत आहेत. आगामी काळात एआय, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डिजिटल सेवांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता सक्षम, सुरक्षित आणि ऊर्जा-कार्यक्षम डेटा सेंटरची उभारणी हीच भविष्यातील सर्वात मोठी गरज ठरणार आहे.
सार्वजनिक क्षेत्र या विषयाचे सर्वम एआयचे जीटीएम साहिल खेतन यांनी चॅटजीपीटीचे दैनंदिन जीवनातील महत्व या विषयी सविस्तर माहिती दिली.
उपाध्यक्ष अमोद कबाडे यावेळी उपस्थित होते. यावेळी महाआयटीचे चिफ ऑपरेटीव्ह ऑफीसर भगवान पाटील यांनी आभार मानले. प्रायमस पार्टनरच्या आदिती धनावडे यांनी सूत्रसंचालन केले
No comments:
Post a Comment