Friday, 24 July 2026

मुंबई महानगरपालिकेने बेवारस वाहनांच्या विल्हेवाटीसाठी

 मुंबई महानगरपालिकेने बेवारस वाहनांच्या विल्हेवाटीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेताना, शहरातील मोठ्या प्रमाणावरील वाहनांच्या तुलनेत विद्यमान व्यवस्था अपुरी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अधिकृत स्क्रॅपिंग केंद्र उभारून बेवारस व निकामी वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचे ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.

            यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका किंवा राज्य शासनाच्या उपलब्ध जागेवर सुमारे पाच एकर जागेत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तातडीने पुढे नेण्याचे निर्देश दिले. या केंद्रासाठी इच्छुक उद्योजकांकडून स्वारस्य अभिव्यक्ती मागविणे, मुंबई महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया राबविणे तसेच परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

            बैठकीत वाहन उत्पादक कंपन्यांच्या विस्तारित उत्पादक जबाबदारी (ईपीआर) धोरणाचा वापर करून वाहनधारकांना जुनी वाहने स्क्रॅप करण्यासाठी प्रोत्साहन देणे, अधिकृत मूल्यांकन केंद्रांची व्यवस्था निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi